लिलाव

Last updated on ऑगस्ट 9th, 2022 at 05:16 pm

ई-लिलाव विक्रीद्वारे भंगाराचा विनियोग

महानिर्मितीच्या सर्व औष्णिक, जल व वायु विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये जमा होणाऱ्या भंगार/ अतिरिक्त / कालबाह्य / दुरुस्त न होण्याजोगे साहित्य / सुटे भाग / उपकरणे / कोल मिल रीजेक्ट (कोलमिल मध्ये भुकटी करण्याच्या प्रक्रियेत नाकारलेला कोळसा) इत्यादींचा  ई-लिलाव पद्धतीने विक्री करून विनियोग केला जातो.

ई-लिलाव विक्रीसाठी उपलब्ध भंगार माल

सर्वसाधारण भंगार :

  • फेरस स्क्रॅप : लोखंड व लोखंडापासून तयार होणारे मिश्र धातू (जसे माइल्ड स्टील, स्टेनलेस स्टील, अलॉय स्टील, कास्ट आयर्न, गॅल्वनाइज्ड आयर्न इत्यादि) या धातूंपासून तयार केलेल्या वस्तूंचे भंगार
  • नॉन-फेरस स्क्रॅप : लोखंडाव्यतिरिक्त इतर धातू (जसे तांबे, अॅल्युमिनियम इत्यादि) आणि मिश्र धातू (पितळ, गन मेटल इत्यादि) या धातूंपासून तयार केलेल्या वस्तूंचे भंगार
  • इलेक्ट्रिकल वस्तूंचे भंगार
  • रबरी वस्तूंचे भंगार जसे वाहनांचे वापरलेले टायर, ट्यूब फ्लॅप, कन्व्हेयर बेल्ट इत्यादि
  • भंगार/ वापरलेली  वाहने जसे बुलडोझर, लोकोमोटिव्ह इंजिन, कार, जीप इत्यादि
  • लाकडी वस्तूंचे भंगार
  • वापरलेले / टाकाऊ ल्युब  तेल (कंटेनरसह)
  • ई-कचरा (इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भंगार)/ बॅटरी

कोल मिल रीजेक्ट (कोलमिल मध्ये भुकटी करण्याच्या प्रक्रियेत नाकारलेला कोळसा)

  • कोल मिल रीजेक्ट : विविध औष्णिक उर्जा केंद्रांवरील कोल मिल्सद्वारे भुकटी करण्याच्या प्रक्रियेत जो कोळसा नाकारला जातो (पारस टीपीएस वगळता).
  • कोल मिल रिजेक्टचा वापर सामान्यतः वीट उत्पादन उद्योगांकडून केला जातो.
  • कोल मिल रिजेक्ट विक्रीमध्ये एसएसआय युनिट्ससाठी (लघुउद्योग) अटींनुसार २०% मिल रिजेक्ट राखीव ठेवण्यात येतो.

वाजवी दरात वीज निर्मिती करण्याची वयोमर्यादा पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले विद्युत निर्मिती संच, अशा संचांशी निगडित कालबाह्य व वापर न झालेले सुटे भाग तसेच इमारती आणि बांधकामे

  • विद्युत निर्मिती केंद्र ज्यांची वाजवी दरात विद्युतनिर्मिती करण्याची वयोमर्यादा पूर्ण झाली आहे.
  • अशा कार्यनिवृत्त विद्युतकेंद्राच्या संबंधित कालबाह्य /न वापरलेले वापरलेले सुटेभाग,वापरलेले सुटे भाग इमारती व बांधकामे विद्युतकेंद्राबरोबर एकत्रित सिंगल लॉट किंवा वेगळ्या लॉटच्या स्वरूपात ई-लिलावाद्वारे विल्हेवाट केली जाते.
  • परिस्थिती व उपलब्धतेनुसार जनरेटर, टर्बाइन, बॉयलर, ट्रान्सफॉर्मर, राख हाताळणी संयंत्र, कोळसा हाताळणी संयंत्र, तेल हाताळणी संयंत्र, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, कूलिंग टॉवर, इलेक्ट्रिक मोटर्स, पंप, वॉल्व्ह आणि बेंडसह पाईपलाइन, ओव्हरहेड क्रेन, कार्यालय इमारती, बांधकांमाचा पाया, चिमणी इत्यादी ई-लिलाव विक्रीचा भाग असू शकतो.

अतिरिक्त/ कालबाह्य/ दुरुस्त न होण्याजोगे –सामुग्री  / सुटे भाग / उपकरणे

ई-लिलाव “जसे आहे तिथे”, “जसे उपलब्ध आहे” आणि “विक्रीनंतर तक्रार नाही” या आधारावर आयोजित केले जातात.

  • संभाव्य बोलीदार ई-लिलाव विक्रीच्या वास्तविक तारखेपूर्वी निर्धारित कालावधीत संबंधित ऊर्जा केंद्रावर सामुग्रीची तपासणी करू शकतात.
  • ऑनलाइन ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी, संभाव्य बोलीदारांनी महानिर्मिती अधिकृत लिलावकर्त्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि लिलावकर्त्याकडे निर्धारित कालावधीत अनामत रक्कम (प्री-बिड EMD) भरणे आवश्यक आहे.
  • लिलाव सामग्रीची यादी, छायाचित्रे, लिलावाचे वेळापत्रक, बोलीपूर्व अनामत रक्कम, (EMD) ई-लिलावाच्या अटी व शर्ती लिलावकर्त्यांच्या संकेतस्थळावर आगाऊ प्रदर्शित केल्या जातात.

महानिर्मिती संपर्क कार्यालय :

उपमुख्य अभियंता (भांडार व्यवस्थापन) यांचे कार्यालय

एचडीआयएल टॉवर्स, ए-विंग, चौथा मजला, ए. के. मार्ग, वांद्रे (ई), मुंबई – ४०००५१

दूरध्वनी : (०२२) २६५८ ०३६७, २६५८ २८४७, २६५८ २४२४ फॅक्स : (०२२) २६५८ २६२७

ई-मेल : gmsmdharavi@mahagenco.in/ gmsmdharavi@gmail.com

संपर्क अधिकारी :

अधिक्षक अभियंता (भां. व्य.) – विस्तार क्र. : ३३१

कार्यकारी अभियंता (भां. व्य.) – विस्तार क्र. : ३१९  

कार्यकारी अभियंता (वा. व नि.) – विस्तार क्र. : ३२१

महानिर्मितीचे अधिकृत लिलावकर्ता :

मेसर्स एम. एस. टी. सी.  मर्यादित

पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, ६०७, रहेजा सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.

दूरध्वनी : (०२२) २२०४०६९८/२२०२२२९६ फॅक्स : (०२२) २२८४५१३०/ २२८७४४७०

संकेतस्थळ : www.mstcindia.co.in / www.mstcecommerce.com

संपर्क अधिकारी  :

श्री सूर्यकांत (प्रादेशिक व्यवस्थापक) – मोबाईल क्र.  : ९९७४०८९९८२

श्री जमील अख्तर (वरिष्ठ व्यवस्थापक) – मोबाईल क्र. : ९३९१०५७७२७

Listen