स्थापित क्षमता

कंपनीच्या संचालक मंडळाने पूर्वीच्या MSEB चा खाते संहिता खंड I ते VI स्वीकारला आहे. महानिर्मिती ची स्थापित क्षमता 13602 मेगावॅट आहे. यामध्ये औष्णिक (जवळपास 75%, म्हणजे 10170 मेगावॅट) आणि उरण येथील स्थापित क्षमता 672 मेगावॅट असलेल्या वायुवर आधारित निर्मिती केंद्राचा समावेश आहे. जीओएम च्या जलसंपदा विभागामार्फत (डब्लूआरडी ) महाराष्ट्र राज्यातील जलविद्युत प्रकल्पांची रचना, उभारणी आणि कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कार्यान्वित झाल्यानंतर जलविद्युत प्रकल्प दीर्घकालीन भाडेतत्त्वावर महानिर्मिती ला संचालन आणि देखभालीसाठी सुपूर्द करण्यात आले. सध्या 2580 मेगावॅट क्षमता असलेले 25 जलप्रकल्प आहेत.

महानिर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीच्या पुढील हरित उर्जा परिस्थितीची जाणीव आहे आणि महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी हरित ऊर्जा हि कंपनीची स्पष्ट दृष्टी आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील वितरण कंपन्यांचे अक्षय ऊर्जा दायित्व पूर्ण करण्यासाठी, महानिर्मिती आजपर्यंत 180MWp सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत.

महानिर्मिती स्थापित क्षमता:(31-10-2017 रोजी)


क्र.
ऊर्जा केंद्रयुनिट व आकार (मेगावॅट)स्थापित क्षमता (मेगावॅट)
Aऔष्णिक ऊर्जा केंद्र
1कोराडी 6 ते 102×210 + 3×6602400
2नाशिक 3 ते 53×210630
3भुसावळ 3 ते 51×210 + 2×5001210
4पारस 3 व 42×250500
5परळी 4 ते 82×210+ 3×2501170
6खेडा 1ते to 54×210 + 1×500 मेगावॅट1340
7चंद्रपूर 3 ते 92×210 + 5×5002920
महानिर्मिती औष्णिक10170
Bवायू टर्बाईन ऊर्जा केंद्र
उरण जी. टी.4×108432
डब्ल्यू. एच. आर. 1 व 22×120240
महानिर्मिती वायु672
Cजलविद्युत ऊर्जा केंद्रे
कोयना जलविद्युतकेंद्र Iव II- 4×70 + 4×80, केंद्र III- 4×80, केंद्र . IV-4×250 व कोयना धरण तळ – 2×181956
लघु जलविद्युत374
घाटघर पंप2×125250
महानिर्मिती जलविद्युत2580
Dसौर80
महानिर्मिती संपुर्ण(A+B+C+D)13602
Listen