उपकंपनी

महागुज कॉलीरीज लि.

ही कंपनी तुमची कंपनी आणि गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी लि. यांच्यामध्ये ओरिसा राज्यातील अगुल जिल्ह्यातील मच्छकाटा येथे कोळसा खाणींच्या कॅप्टिव्ह खाणकामासाठी संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीने खाण विकसक अथवा व्यवस्थापकाची नियुक्ती केली आहे. भूसंपादन, विविध सरकारी मंजुऱ्या यासारख्या महत्त्वाच्या प्राथमिक कामांची प्रक्रिया सुरू आहे. 6 मे 2010 रोजी 30 एमटीपीए कोळशासाठी एमडीओ म्हणजेच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि महागुज कॉलियरीज लिमिटेड यांच्यात कोळसा खाण सेवा करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे

धोपावे कोस्टल पॉवर कंपनी लि.

भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रकरण-2 अंतर्गत विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना हरित क्षेत्र प्रकल्प म्हणून कार्यान्वित करण्यासाठी या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे

महागाम्स (महानिर्मिती राख व्यवस्थापन सेवा लि ).

MSPGCL च्या नवीन ऍश धोरणानुसार राख वापर आणि व्यवस्थापन व्यवसायासाठी DTPCL च्या नावात आणि उद्देशात संबधित बदल करून महानिर्मिती ने जून 2016 मध्ये MAHAGAMS म्हणजेच (महानिर्मिती अॅश मॅनेजमेन्ट सर्व्हिस लि ) ही पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे.

Listen