चाचणी प्रयोगशाळा

Last updated on मार्च 14th, 2023 at 05:54 pm

maha genco logo केंद्रीय कोळसा आणि तेल चाचणी प्रयोगशाळा विस्तार सेवा इमारत, ३x६६०मेगावॅट कोराडी औष्णिक विद्युत केंद्राजवळ, कोराडी, नागपूर फोन: +९१-८४०८८८९९३५ ईमेल: ccotl@mahagenco.inTC 5380

केंद्रीय कोळसा आणि तेल चाचणी प्रयोगशाळा चाचणी आणि अंशांकन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (एन.ए.बी.एल.) द्वारे मान्यताप्राप्त आहे, प्रयोगशाळा मान्यता आयएसओ/आयईसी १७०२५: २०१७ च्या मानकांवर आधारित रोहीत्र तेल नमुना चाचण्या करण्यासाठी “चाचणी आणि अंशांकन प्रयोगशाळेच्या सक्षमतेसाठी सामान्य आवश्यकता “.  ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रोहीत्र तेल नमुना चाचणी विश्वासार्ह, अचूक आणि वेळेवर चाचणी सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने एनएबीएल मान्यता ही एक प्रतिष्ठित कामगिरी आहे. आमची प्रयोगशाळा विस्तार सेवा भवन, ३x६६० मेगावॅट कोराडी औष्णिक विद्युत केंद्राजवळ, कोराडी, नागपूर येथे आहे, आणि आम्ही १९९० पासून या क्षेत्रात सक्रियपणे सहभागी आहोत.

ही एन.ए.बी.एल. मान्यता मिळवण्यासाठी ग्राहक म्हणून तुमचे अमूल्य योगदान आम्ही ओळखतो. पूर्वीच्या आमच्या धोरणाप्रमाणे, आम्ही भविष्यात तुम्हाला आणखी चांगली सेवा देण्याची ही संधी पाहत आहोत. तुम्हाला कोणतीही माहिती/स्पष्टीकरण हवे असल्यास, कृपया आमच्याशी ccotl@mahagenco.in  वर संपर्क साधा.

Listen