Last updated on मार्च 3rd, 2023 at 06:40 pm
ध्येय
“सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून स्पर्धात्मक दरात महाराष्ट्र राज्यासाठी सातत्याने पुरेशी वीजनिर्मिती करणे.”
उद्दिष्टे
- राज्याची भविष्यातील विजेची गरज पूर्णतः भागविण्यासाठी प्रयन्तशील राहणे. तसेच पुरेशा राखीव वीजनिर्मितीसाठी मोलाचा ठरेल अशा विकासासाठी पुढाकार घेणे.
- ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सौर, पवन, वायु, जलविद्युत आदि स्रोतांचा वापर करून विविधता आणणे तसेच जीवाष्म इंधनाचा जबाबदारीने वापर करून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमीतकमी करणे.
- ऊर्जानिर्मितीचा खर्च नियंत्रित करून तसेच आपली कामगिरी व कार्यक्षमता सातत्याने उत्कृष्ट ठेवून रास्त दरातील वीज निर्मितीसाठी वचनबद्ध असणे.
- कंपनीच्या सर्व हितसंबंधी घटकांना लाभदायक ठरेल अशाप्रकारे चापल्य दाखवून हिमतीने आपले उद्योग क्षेत्र विस्तारित करणे, तसेच आर्थिक चक्रात व ऊर्जेच्या गतिमान बाजारपेठेत नेहमी यशस्वी होण्यासाठी अनुरूप असे बदल करणे.
- वीजनिर्मिती केंद्रासमीपच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्थानिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी पराकाष्ठा करणे.