+A A -A
screen-reader



/

"आनंदी जीवनाचे राजमार्ग" अभिनव कार्यक्रम

मुंबई ७ फेब्रुवारी २०२४: ऊर्जा उत्पादन क्षेत्रात कार्यरत महानिर्मिती मनुष्यबळाचे दैनंदिन कौटुंबिक तसेच कार्यालयीन जीवन सुखी-आनंदी रहावे, तणावमुक्त रहावे यासाठी सुप्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख यांचे "आनंदी जीवनाचे राजमार्ग" या विषयावर  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महानिर्मिती गतिमान प्रशासन-मानव संसाधन या संकल्पनेनुसार या अभिनव उपक्रमाचे आयोजन सभागृह ६ वा माळा, प्रकाशगड, वांद्रे पूर्व येथे करण्यात आले. याप्रसंगी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक(प्रकल्प) अभय हरणे, मुख्य महाव्यवस्थापक(मानव संसाधन) आनंद कोंत प्रामुख्याने उपस्थित होते. 

संचालक(खनिकर्म) डॉ.धनंजय सावळकर यांच्या विशेष पुढाकारातून या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  अशोक देशमुख यांनी आनंदी जीवनाचे १० राजमार्ग सांगितले त्यामध्ये विशेषतः  बोलणे, हसणे, चालणे, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, पुरेशी निद्रा, प्राणायाम, पैसा, ताल-सूर, दान, योग इत्यादींचा समावेश होता. अतिशय विनोदी शैलीत मार्मिक उदाहरणांसह त्यांनी विषयाची उकल करून उपस्थितांची मने जिंकली.

या सोबतच आत्महत्या करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची अडीच मिनिटे किती महत्वाची असतात, नेमके त्यावेळेस काय केले पाहिजे हे त्यांनी सांगितले. छोट्या-छोट्या व्यायामातून व्याधी अंगदुखी कशी  दूर करावी हे प्रात्यक्षिकांसह त्यांनी सांगितले. अपचन, अनियमित जेवण, उशिरा झोप,चहाचा अतिरेक,मनातील विचारांचे काहूर कसे दूर करायचे,  तणावाचे प्रकार, तणावाच्या पायऱ्या, राग कमी करण्यावर उपाययोजना तसेच मित्र, टाळ्या, नादब्रम्ह,ओंकार जप आणि पर्यटनाचे महत्व त्यांनी पटवून सांगितले. सलग दोन तास अगदी सोप्या भाषेत, हसतखेळत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली चुंगडे यांनी तर मानव संसाधन विभागामार्फत आभार आनंद कोंत यांनी मानले.

Scroll