+A A -A
screen-reader



/

खापरखेडा वीज केंद्रातून महत्तम ९३.२८ टक्के भारांकासह १२५० मेगावाट  वीज उत्पादन


महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात प्रत्येकी २१० मेगावाट क्षमतेचे चार संच तर ५०० मेगावाट क्षमतेचा एक संच अशी एकूण ५ चे कार्यरत असून त्याची १३४० मेगावाट इतकी स्थापित क्षमता आहे. ८ जानेवारीला खापरखेडा वीज केंद्राच्या वर्धापन दिनाला मुख्य अभियंता श्री.विजय राठोड आणि टीम खापरखेडा ने  महानिर्मिती व्यवस्थापनाला आगामी काळात १२५० मेगावाट चे लक्ष्य आम्ही पूर्ण करू असा संकल्प केला होता आणि त्यादृष्टीने  खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकारी-अभियंता-कामगार आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा, देखभाल दुरुस्ती आणि उपाययोजना केल्या आणि आज २९ फेब्रुवारी २०२४ रोजी  सायंकाळी ५ च्या सुमारास तब्बल १२५० मेगावाट महत्तम वीज उत्पादनाचे लक्ष्य ९३.२८ टक्के भारांकासह  गाठण्यात या चमुला यश आले आहे. 

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.डॉ.पी.अनबलगन यांनी खापरखेडा विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री.विजय राठोड व समस्त टीम खापरखेडा यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे. 

वरिष्ठ व्यवस्थापनाचे सहकार्य, मार्गदर्शन आणि खापरखेडा टीम चे सांघिक प्रयत्न यातून ही फलश्रुती झाली असल्याचे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री.विजय राठोड यांनी काढले व त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले तथा आभार मानले.

Scroll