पारस वीज केंद्राच्या संचाची अखंडित वीज उत्पादनात विक्रमी वाटचाल
वीज संचांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ
पारस ४ मार्च २०२४ : महानिर्मितीच्या पारस वीज केंद्राने वीज उत्पादनात कायम नावलौकिक राखला आहे. २५० मेगावाट क्षमतेचा संच क्रमांक ४ हा सलग मागील २३१ दिवसांपासून सुरू आहे. हा संच अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने वीज उत्पादनाच्या क्षेत्रात एका नवीन ऐतिहासिक क्षणाकडे या संचाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तसेच दोन्हीही संच सलग १२४ दिवस चालू होते, पारस संच क्रमांक-३ च्या नावे अखंडित वीज उत्पादनाची १६६ दिवसांच्या विक्रमाची नोंद आहे.
पारस वीज केंद्राने नोव्हेंबर-२०२३ (९०.२२%), जानेवारी-२०२४ (९१.०२%) आणि फेब्रुवारी-२०२४ (९५.५५%) मध्ये मासिक MERC AVF(उपलब्धता घटक) वर Zero Disallowance ''शून्य नामंजूर'' लक्ष्य यशस्वीरीत्या साध्य केले आहे हे विशेष.
पारस वीज केंद्राने ने २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी-२०२४ (९३.९७%) मध्ये सर्वाधिक मासिक CEA PLF(केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक) गाठले आहे.
पारस वीज केंद्राने ऑगस्ट-२०२३ पासून मासिक SOC (विशिष्ट इंधन वापर) वर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली आहे.
उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज असल्याचे मुख्य अभियंता शरद भगत यांनी सांगितले.