+A A -A
screen-reader



/

कोराडी औष्णिक विद्युत केंद्राद्वारे आयोजित, रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसाद, विक्रमी २१३ रक्तपिशव्यांचे संकलन.

 

(कोराडी, दि. २४/१०/२०२४) : कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी, विद्युत विहार कोराडी येथील दवाखान्यात आयोजित रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

येथील अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, या सर्व रक्तदात्यांनी विक्रमी २१३ रक्तपिशव्या दान करून नवा उच्चांक नोंदविला. अधीक्षक अभियंता सचिन भगेवार यांनी सपत्नीक रक्तदान करून सर्वांपुढे आदर्श ठेवला.

रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यासाठी, रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, कोराडी औाष्णिक विद्युत केंद्रामध्ये आणि विद्युत विहार वसाहतीमध्ये जनजागृती आणि प्रसिद्धी अभियान राबविण्यात आले.

या प्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिबिराचे उद्घाटक, कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे, प्रमुख पाहुणे कोराडी प्रशिक्षण केंद्राचे मुख्य अभियंता सुनील सोनपेठकर, उप मुख्य अभियंते शैलेन्द्र कासूलकर, सचिन देगवेकर, भास्कर इंगळे, केंद्रातील सर्व अधीक्षक अभियंते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित ग्वालवंशी, वैद्यकीय अधिकारी कुणाल बावणे, कल्याण अधिकारी मयूर मेंढेकर, समन्वयक प्रविन बुटे, वर्धापन दिन सचिव महेश घुरीले, सह सचिव जनार्दन तिजारे, दवाखाना विभागातील सौ. स्नेहा तेलरांधे, जीवन ज्योती ब्लड बँकेचे डॉ. मानकर, डॉ. सौ. शीला मुंधडा, सौ. सरोज पवणीकर, कर्मचारी आणि वीज केंद्रातील विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, रक्तदान शिबीर आयोजन समितीचे पदाधिकारी आणि सदस्य, सर्व संघटना पदाधिकारी/प्रतिनिधी, कर्मचारी, वसाहतीं मधील रहिवाशी आणि कंत्राटी कामगार बहुसंख्यने उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सौ. स्नेहा तेलरांधे यांनी केले.

सर्व रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत, या राष्ट्रीय कार्यामध्ये स्वयं:प्रेरणेने सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे विक्रमी सहभाग नोंदवल्या बद्दल मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Scroll