कोराडी वीज केंद्राचा ५० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
विश्वासार्ह आणि शाश्वत महत्तम वीज उत्पादन हीच काळाची गरज ...संजय मारुडकर
कोराडी वीज केंद्राकडून महानिर्मितीच्या अधिक अपेक्षा...अभय हरणे
(कोराडी, २ नोव्हेंबर २०२४) : मागील पाच दशकांपासून नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत अखंडित वीज उत्पादनासह राज्याला प्रकाशमान करण्याचे राष्ट्रीय कार्य कोराडी औष्णिक विद्युत केंद्र करीत असून ह्यावर्षी कोराडी वीज केंद्र आपल्या गौरवशाली परंपरेचा ५० वा सुवर्णदीप महोत्सवी वर्धापन दिन साजरा करीत असल्याचे गौरवोद्गार संजय मारुडकर संचालक(संचलन) यांनी सांगितले. ते विद्युत विहार वसाहत रंगमंच कोराडी येथून बोलत होते.
वर्धापन दिनाच्या अध्यक्षस्थानी विलास मोटघरे, प्रमुख अतिथी संजय मारुडकर संचालक(संचलन), अभय हरणे संचालक(प्रकल्प) तर विशेष अतिथी कार्यकारी संचालक पंकज सपाटे, विवेक रोकडे, विशेष उपस्थिती मुख्य अभियंते राजेशकुमार ओसवाल, सुनील सोनपेठकर, विजय राठोड, वर्धापन दिन सचिव महेश घुरिले प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी संजय मारुडकर म्हणाले की कोराडीत विलास मोटघरे यांच्या नेतृत्वात अतिशय उत्साहाचे वातावरण आहे, ह्यावर्षी महानिर्मितीने वर्षभरात विक्रमी वीज उत्पादन केले त्याबद्दल विशेष अभिनंदन. आगामी काळात आपल्याला तात्पुरते/क्षणिक महत्तम वीज उत्पादन न घेता शाश्वत महत्तम वीज उत्पादन घ्यायचे आहे. आगामी काळात पर्यावरणपूरक वीज उत्पादन करावे लागणार, कार्यक्षमता सुधारण्यासाठी काही योजना राबविण्यात येत असून त्याचा निश्चित फायदा होईल. खर्च कमी करावा लागणार आहे. अभिनव चांगल्या कल्पना राबवाव्या लागतील आणि खडतर मार्गातून प्रवास सुकर करायचा आहे त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे.
अभय हरणे म्हणाले की, कोराडीने कायम नवनवीन गोष्टी प्रथम केल्या आहेत. आगामी काळात महानिर्मितीचे व्हिजन २०३५ नुसार अनेक नवनवीन प्रकल्प कामे नियोजित असल्याचे तपशीलवार त्यांनी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल अनुभवी मनुष्यबळामुळे महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राकडून अधिक अपेक्षा आहेत.
विलास मोटघरे यांनी आपल्या भाषणातून कोराडीची आजवरची विक्रमी कामगिरी, संच १० मधून शंभर दिवसांपेक्षा जास्त अखंडित वीज उत्पादन आणि आगामी काळात कोराडी पॉवर हब होणार असल्याचे सूतोवाच केले. कोराडी परिसरात निवासी संकुल, हॉस्पिटल, जलतरण तलाव, जिम्नॅशियम सारख्या अत्याधुनिक बाबी देण्याबाबतची मागणी संचालक प्रकल्प यांचे समोर मांडली.
ह्या प्रसंगी कार्यकारी संचालक पंकज सपाटे, विवेक रोकडे यांची मुख्य अभियंते सुनील सोनपेठकर , विजय राठोड, राजेश कुमार ओसवाल यांची समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी महानिर्मिती कोराडी तंत्रज्ञ-२ गजानन हनवते यांच्या आकस्मिक निधनाबद्दल त्यांच्या प्रति शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या सांगता समारंभात ढोल ताशा पथक, फटका शो , संगीत रजनी विशेष आकर्षण ठरली तर हॅप्पी स्ट्रीट, क्रीडा, कला, मनोरंजन, रक्तदान शिबिर २१३ रक्त पिशव्या, आनंद मेळावा, कराओके सारख्या कार्यक्रमातून सशक्त वातावरण निर्मीती झाली. तर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
ह्या प्रसंगी उप मुख्य अभियंते विराज चौधरी, नारायण राठोड, भास्कर इंगळे, सुदीप राणे, शैलेंद्र कासुलकर तर अधीक्षक अभियंते सचिन देगवेकर, सचिन भगेवार, राजेश उमप, राजेश डाखोळे, कुणाल घाटे, भादीकर, उप महाव्यवस्थापक(मासं) अतुल बोरकर, महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) सीमा महाले, सहसचिव जनार्दन तिजारे, विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचलन सोनाली पगारे, वैष्णवी वंजाळकर यांनी केले तर प्रास्ताविकातून आयोजनामागची भूमिका महेश घुरिले यांनी व्यक्त केली तर मान्यवरांच्या संदेशाचे वाचन व पारितोषिक वितरण, समन्वयक प्रवीण बुटे यांनी केले. उपस्थितांचे आभार मयूर मेंढेकर यांनी मानले.
सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या यशस्वी आयोजनात कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, वर्धापन दिन आयोजन समिती पदाधिकारी, सदस्य, इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.