+A A -A
screen-reader



/

- वृत्तपत्रीय निवेदन -

ऊर्जा विभागाच्या इंग्रजी चित्रफितीला राष्ट्रीय पुरस्कार

 

(मुंबई : २५ डिसेंबर २०२४) : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित छत्तीसगडमधील रायपूरच्या हॉटेल बेबीलॉन इंटरनॅशनलमध्ये ४६ व्या राष्ट्रीय संमेलनात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या इंग्रजी भाषेतील चित्रफितीला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. छत्तीसगड राज्याचे उप मुख्यमंत्री श्री. अरुण साव यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार महानिर्मितीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. यशवंत मोहिते यांनी देशातील सुमारे २०० जनसंपर्क तज्ज्ञांच्या/व्यावसायिकांच्या उपस्थितीत स्वीकारला.

या प्रसंगी `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव डॉ. पीएलके मूर्ती, डॉ. यू.एस. शर्मा, नरेंद्र मेहता, सत्येंद्र प्रसाद सिंग, दिलीप चौहान, अनु मुजुमदार, रायपूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. शाहिद अली व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

गांधीनगर गुजरात येथे सप्टेंबर २०२४ मध्ये संपन्न झालेल्या चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा परिषदेसाठी सहभागी होणाऱ्या देश-विदेशातील प्रतिनिधींना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या ऊर्जा विभाग महाराष्ट्राच्या चित्रफितीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अतिशय गौरवाची बाब आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या निर्देशानुसार तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती. आभा शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामांचा, हरित ऊर्जा क्षेत्रातील अभिनव योजनांचा आगामी संसाधन पर्याप्तता आराखडा या चित्रफितीत मांडण्यात आला आहे.

महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने अतिशय कमी वेळेत ही आकर्षक चित्रफीत तयार केल्याबद्दल तसेच राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती. आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अन् बलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महासंचालक महाऊर्जा डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.

Scroll